सोलापूर प्रतिनिधी
सोलापूर महानगरपालिका प्राथमिक आरोग्य केंद्र सोरेगाव व लायन्स क्लब सोलापूर ट्विन सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आणि लायन्स नेत्रालय सोलापूर यांच्या सहकार्याने आरोग्य निरीक्षक कार्यालय कोळी समाज सैफुल येथे आजू बाजूच्या परिसरातील सर्व महिलांसाठी मोफत सर्वरोग महाआरोग्य शिबिर याचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन आरोग्य अधिकारी डॉ. संस्कृती वळसनकर व लायन्स क्लब सोलापूर ट्विन सिटी चे अध्यक्ष इंजि. सागर पुकाळे यांच्या हस्ते करण्यात आले.
या शिबिरामध्ये डोळे तपासणी, मोतीबिंदू, दंत तपासणी, महिलांचे आजार तसेच उच्च रक्तदाब, डायबिटीस, सीबीसी टेस्ट, रक्त तपासणी, सर्दी, खोकला, ताप, डेंगू , मलेरिया यांच्या गोळ्या औषध सह स्वाइन फ्लू साठी मोफत इंजेक्शन देण्यात आले एकूण या शिबिरामध्ये लहान बाळापासून ते वयोवृध्द महिलांपर्यंत असे 185 जणांनी या मोफत सुविधेचा लाभ घेतला तर 7 जणांना मोतीबिंदू शस्त्रक्रिया साठी डॉक्टरांनी लायन्स नेत्रालय येथे जाऊन उपचार घेण्यास सांगितले.
यावेळी लायन्स क्लब जुळे सोलापूर चे अध्यक्ष अभियंता सागर पुकाळे यांनी म्हणाले की सध्या बदलत असलेल्या हवामानामुळे लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्व जण आजारी पडत आहेत घरातील महिला आजारी पडल्या तरी दैनंदिन त्यांची कामे व असलेली जबाबदारी यामुळे सहसा महिला लवकर वेळेत डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेत नाहीत त्यामुळे त्यांना मोठा आजार होतो वा संपूर्ण कुटुंबातील सर्वजण आजारी पडतात त्यामुळे घरातील महिला जर तंदुरुस्त व सुदृढ असेल तर संपूर्ण कुटुंब निरोगी व आनंदी असते म्हणून हीच गरज ओळखून महिला सशक्तीकरणासाठी हा खास महिलांसाठी मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे असे म्हणाले.
यावेळी डॉक्टर अश्विनी वांगीकर लायन्स क्लब ट्विन सिटी चे खजिनदार राजेश परसगोंड ज्येष्ठ लायन नागेश बुगडे सोरेगाव आरोग्य केंद्राचे सर्व स्टाफ डॉक्टर पॅरामेडिकल सिस्टर आशा वर्कर तसेच लायन्स नेत्रालयचे महासिध्द म्हमाणे, सुरज जाधव, राजशेखर जेऊरे यांच्यासह परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.