संग्रामनगर प्रतिनिधी केदार लोहकरे तेज न्यूज
कोल्हापूर येथील वेणूताई चव्हाण होमियोपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयाच्या सन १९८४ ते २०२० बॅचमधील माजी विद्यार्थ्यांचा गेट-टुगेदर कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात जयश्री नरके यांच्या नरकेवाडी अमृतधारा फार्म हाऊस (कळंबा,कोल्हापूर) येथे पार पडला.अनेक वर्षांनंतर एकत्र आलेल्या विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत काॅलेजच्या जीवनाचा पुन्हा एकदाआनंद घेतला.
या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलाने वेणूताई चव्हाण होमियोपॅथिक मेडिकल कॉलेजचे प्रथम शिक्षक जेष्ठ होमियोपॅथिक तज्ञ डॉ.मोहन गुणे,प्राचार्य डॉ.जे.एस.पाटील,डॉ.श्रीधर पाटील,प्रोफेसर डॉ.बी.पी.पाटील, डॉ.एम.बी.पाटील,डॉ.दिलीप परांजपे,डॉ.नंदकुमार शेट्ये, विद्यमान प्राचार्य डॉ.राजेश कागले, डॉ.सौ.कागले मॅडम,शशिकांत कसबेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रास्ताविकात वेणूताई चव्हाण होमियोपॅथिक मेडिकल कॉलेज माजी विद्यार्थी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.बाळकृष्ण गायकवाड यांनी सर्व माजी विद्यार्थी यांनी एकत्र येऊन अडचणीत आलेल्या वेणूताई चव्हाण होमियोपॅथिक मेडिकल कॉलेजला पहिले दिवस आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगत वर्षातून एकदा तरी सर्व माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन विचारांची देवाण घेवाण करावी असे आवाहन केले.
संघटनेचे सचिव डॉ.संदीप पाटील यांनी एकत्र आलेने,जुन्या मित्रांच्या भेटीगाठीने,संवादाने मनावरील ताण कमी होवून निरोगी आयुष्य जगण्यास मदत होते.विचारांची देवाणघेवाण होण्यासाठी जुने मित्र भेटावेत यासाठी स्नेह संमेलन आयोजित केले असल्याचे सांगत दरवर्षी हा योग जुळून आणण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले.
स्नेहसंमेलनासाठी आलेल्यांचे स्वागत तुतारी वाजवून व कोल्हापुरी फेटे बांधून बैलगाडीतून मिरवणूक काढून करण्यात आले.प्रारंभी संघटनेचे सदस्य डॉ.मकसूद पटेल यांनी आपल्याला सोडून गेलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहिली.यानंतर उपस्थितांनी आपापल्या शैक्षणिक आणि व्यावसायिक प्रवासातील अनुभव एकमेकांशी शेअर केले.विविध मनोरंजनात्मक खेळ,सांस्कृतिक कार्यक्रम,बैलगाडा सफर,कराओके गाणी,नृत्य,कवाली,विश्व शांतीसाठी डॉ.संदीप पाटील यांचा शंखनाद आणि समूहचर्चांमुळे कार्यक्रमात रंगत आली.
सन १९९७ व १९९९ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांची धुरंधर स्टाईल एंट्रीने कार्यक्रमाला रंगत आणली.यावेळी माजी विद्यार्थी डॉ.आण्णासाहेब पाटील,डॉ. जयवंत पाटील यांनी राजकीय क्षेत्रात प्रवेश करून पंचायत समितीत सदस्य म्हणून निवडून आले.शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे लेखाधिपतीपदी असलेल्या डॉ.सुहासिनी पाटील,७०० किलोमीटरचा प्रवास करून नंदुरबारवरून आलेले डॉ.योगेश पाटील,५०० किलोमीटरचा प्रवास करून मुंबईवरून आलेले डॉ.संजय चौबे,डॉ.नितीन थोरवे,डॉ.अरविंद कुटारकर,डॉ.रचिता सावंत,डॉ. अनिता शिंदे,नाशिकवरून डॉ. माधुरी महाडीक व डॉ.जितेश पाटील हे ख़ास गेट टुगेदरसाठी आले तसेच मा.प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षेकेतर कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.
सर्व प्राध्यापकानी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना भविष्यातही एकमेकांशी संपर्क कायम ठेवण्याचे आवाहन केले.या कार्यक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी अशा भेटीगाठी नियमितपणे आयोजित करण्याची इच्छा व्यक्त केली.कार्यक्रमाचा समारोप सामूहिक छायाचित्र व कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सासह स्नेहभोजनाने झाला.उपस्थितांनी हा दिवस अविस्मरणीय असल्याची भावना व्यक्त केली.आयोजकांनी सर्व सहभागींचे आभार मानून पुढील वर्षी आणखी मोठ्या प्रमाणावर गेट-टुगेदर आयोजित करण्याचा संकल्प व्यक्त केली तर माजी विद्यार्थी संघटनेचे सदस्य डॉ.शामप्रसाद पावसे यांच्या शेतातील सेंद्रिय केशर आंबे प्रत्येकाला भेट म्हणून देण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघटनेचे सदस्य डॉ.विजय खाडे,डॉ.विजयकुमार माने,डॉ.मकसूद पटेल,डॉ. शामप्रसाद पावसे,डॉ.वैभव भंडारी, डॉ.राजेश बर्डे,डॉ.अमरसिंह मोहिते, डॉ.दत्ताजी चोपडे पाटील,डॉ. अंबाजी शेंडगे,डॉ.विलास कलेकर, डॉ.तानाजी हरेल,डॉ.अनिता शिंदे पांडव,डॉ.मानसिंग पाटील,डॉ. प्रवीण पाटील,डॉ.सचिन वनमोरे, डॉ.श्रीकांत चौगुले,डॉ. माणिक पाटील,डॉ.मिलिंद पोरे,डॉ.वर्षा करंजकर,डॉ.स्वरूपा गायकवाड, डॉ.सचिन बाबर,डॉ.गिरीश कोरे, डॉ.रवी मगदूम,डॉ.रश्मी व डॉ. निलेश पेंडूरकर,डॉ.दत्ता कारंडे,डॉ. ज्योती रणनवरे,डॉ.शुभांगी माने देशमुख,डॉ.शिवाजीराव काळे,डॉ. अमर माने देशमुख,डॉ.गोपाळ ऐरोनी,डॉ.मोनिका कानडे,डॉ. सत्यजित देसाई,डॉ.विनीत बनसोडे, डॉ.ऋषिकेश निकम,डॉ.नईम मुजावर,डॉ.सारंग भोईटे,डॉ. अमजद गोरे,डॉ.युवराज पोवार, डॉ.नासिर मुल्ला,डॉ प्रदीप काटकर, डॉ.अर्चना शुक्ला,डॉ.आशिष दरुरे, डॉ.अमोल पाटील,डॉ.चंद्रकांत होडे, डॉ.अतुल शेळके,डॉ.कमलेश जांभळे,डॉ.मानशी पाटील,डॉ. राजाराम पाटील,डॉ.तुषार जोशी डॉ.अजित पाटील,डॉ.आनंद साबळे,डॉ.समीर पारेख डॉ.श्वेता पाटील,डॉ.गिरीश कोरे,डॉ.स्मिता देसाई,डॉ.सुजाता पाटील,डॉ. वैशाली चव्हाण,डॉ.लक्ष्मीकांत नलवडे,डॉ.प्राची शिंदे,डॉ.महेश तायशेठे,डॉ.अरुणा पाटील डॉ. विकास पाटील इ.मेहनत घेतली. संघटनेचे खजिनदार डॉ.विक्रम आडके यांनी आभार मानले.पुढील वर्षी पुन्हा सर्वांनी भेटण्याची इच्छा व्यक्त करत सर्वांनी जड अंतकरणांनी निरोप घेत.आपला परतीचा प्रवास सुरू केला पण एका दिवसाच्या मित्र मैत्रीणीच्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह संमेलनामुळे व भेटीने एक आनंदात कसा गेला हे कुणाच समजले नाही.


