भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स भाळवणी या विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.विद्यार्थ्यांना शारीरिक व मानसिक स्वास्थ्याचे महत्त्व पटावे या उद्देशाने विशेष योग सत्र घेण्यात आले.
यावेळी प्रशालेचे क्रीडाशिक्षक गजानन जमदाडे व विद्यार्थी कृष्णा करांडे यांनी विविध योगासनांचे प्रात्यक्षिक करून दाखवले व त्यांच्या महत्त्वाविषयी मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनीही उत्साहाने सहभाग घेत, सूर्यनमस्कार, प्राणायाम व ध्यानधारणा यांचा अनुभव घेतला. योग ही केवळ व्यायाम पद्धती नसून ती जीवनशैली आहे, हे या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवण्यात आले.
यावेळी प्राचार्य के.डी.शिंदे , उपमुख्याध्यापिका श्रीमती मोरे ,पर्यवेक्षक बेसिकराव व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.