नाशिक प्रतिनिधी तेज न्यूज
जिथे कमी तिथे आम्ही या उक्तीवर चालणाऱ्या नमस्ते नाशिक फाउंडेशन ही संस्था नेहमी समाज उपयोगी उपक्रम राबवत असते . असाच एक उपक्रम महावीर इंटरनॅशनल चे अनिल नाहर यांच्या सहयोगाने एक हात मदतीचा ह्या उपक्रमांतर्गत राबविण्यात आला.
आजचा दिवस हा कायम आठवणीत राहील . आज आम्ही शिरसाळे येथून नासिक कडे येत असताना वाडीवरे गावा जवळ एक गरजू वयस्कर आजी भर पावसामध्ये भिजत भाजी विकत असताना संस्थेच्या अध्यक्ष स्नेहल देव यांच्या नजरेत पडल्या , त्यांनी क्षणाचाही विलंब न करता गाडी बाजूला लावून त्या आजींना व्यवसायिक उपयुक्त अशी व्यवसायिक छत्री भेट म्हणून दिली .
त्या आजींना मिळालेली लाख मोलाची भेट ही त्यांच्या नजरेतुन दिसत होती व त्यांना झालेला आनंद हा त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता .हाच आशीर्वाद समजून आम्ही त्या आईचे धन्यवाद मानले व त्यांना ही भेट देऊन त्यांचा आशीर्वाद घेतला.