मुंबई प्रतिनिधी गणेश हिरवे तेज न्यूज
अभिषेक शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून तसेच ईपीएस वर्डवाईड यांच्या सयुक्त विद्यमाने गोरेगाव पूर्व येथील खांबाचा पाढा येथे शालेय साहित्य वाटप करण्यात आले ज्या मुलांची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याकारणाने मुले पुढे शिक्षण घेणे थांबवतात अशा आदिवासी मुलांना अभिषेक शैक्षणिक सामाजिक संस्था ही शालेय साहित्य देऊन त्यांच्या शिक्षणात हातभार लावण्याचा उपक्रम राबवत असते.
खांबाच्या पाड्यामध्ये ९५ मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले .मुलांच्या मनोरंजनासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते मुलांसाठी गाणे कार्यक्रम गायक निर्मल गुलेरिया यांनी गायली त्यांच्या गाण्यांचा कार्यक्रमास उपस्थित सर्वांनी मनमुराद आनंद लुटला.
त्याचप्रमाणे भारतीय मानक ब्युरो चे सायंटिस्ट टी अर्जुन यांनी तेथील मुलांना व त्यांच्या पाल्यांना आपण आयएसआय मानांकन असलेली व सोन्यावर हॉलमार्क असलेली वस्तू खरेदी करावी याची माहिती दिली.
यावेळी ईपीएस वर्ड वाईड चे अध्यक्ष दिलीप साहू चित्रकार उल्हास नांद्रे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते .
मधुकुमार राठी, नूतन शिकरे, ऋतुजा नागरे वनिता मराठे प्रसाद मराठे राजे दुबे सुरज विश्वकर्मा अभिषेक नागरे संस्थेचे पालघर जिल्ह्यातील कार्यकर्ते दानिश शेख दीपा शर्मा सुधा कुलकर्णी सारिका गुनेरीया ,या नाशिक जिल्ह्यातील संस्थेचे युवा कार्यकर्ते सुरज भाबड भारतीय जडेयार संजय गांधी नॅशनल पार्क महाराष्ट्र शासन अमर समर्थ या सर्वांच्या हस्ते ९५ मुलांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी खांबाचा पाड्याचे प्रमुख प्रशांत पागे यांनी अभिषेक शैक्षणिक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सौ सुनीता नागरे व दिलीप साहू यांचे केलेल्या सहकार्यामुळे आभार मानले