भाळवणी प्रतिनिधी
भाळवणी येथील स्वस्त धान्य दुकानात पात्र शिधा पत्रिका धारकांना गौरी गणपती सणानिमित्त शासनाने 100 रुपयात साखर, तेल,रवा,डाळ अशा 4 वस्तू दिल्या आहेत. याशिवाय मोफत गव्हू व तांदूळ ही दिला जात आहे.
यावेळी हरिभाऊ शिंदे,ज्ञानेश्वर खरडकर, शिवाजी बाबर,सुनिल पाटील,सरपंच राजीव पाटील,हरिभाऊ लिंगे,भोजलींग बाबर,धैर्यसिंह निंबाळकर,विजय शिंदे,सचिन भोसले,सागर चौगुले,नामदेव माने,जनार्दन सराटे आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी रेशन दुकानदार धोंडीराम शिंदे म्हणाले की, भाळवणी रेशन दुकान नं-१ व 2 तसेच प्रगती महिला बचत गट स्वस्त धान्य दुकान मधील सर्व पात्र रेशन कार्ड धारकांना कळविण्यात येते की, माहे सप्टेंबर महिन्यातील गौरी गणपती सणा निमीत महाराष्ट्र शासना तर्फे आनंदाचा शिधा ( कीट ) रूपये १०० मध्ये मिळणार आहे.तसेच रेगुलर धान्य मोफत आहे.तरी सर्वांनी आपला आनंदाचा शिधा ( कीट ) व धान्य घेऊन जाने.वाटप शुक्रवार दिनांक 15/9/2023 पासून सुरू राहणार आहे.दुकान सकाळी 9 ते 1 व सायंकाळी 4 ते 8 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.फोन नंबर 9834241446/9860078390.यावेळी माणिक शिंदे यांनी आभार मानले.