मुंबई प्रतिनिधी
प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक अल्ताफ दादासाहेब शेख यांना "लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड" पुरस्कार पोस्टमनच्या हस्ते विदेशातला पुरस्कार घेतला .
वेडा BF, बेतुका, कम ऑन विष्णू, डबल्यु, असे एकाहून एक सरस चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक अल्ताफ दादासाहेब शेख यांच्या नावाची नुकतीच "लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड" मध्ये नोंद झाली. त्यांचा 2018 साली प्रदर्शित चित्रपट' वेडा बी एफ 'मधील अल्ताफ राजा यांनी प्रथमच मराठीत गायलेली कव्वाली ". हे माझे दुर्वेश बाबा" या गाण्यासाठी त्यांच्या नावाची नव्या किर्तीमानात सुवर्ण अक्षरांनी नोंद झाली.
हा चित्रपट तयार होत असतानाचा एक प्रसंग अल्ताफ शेख सांगतात, जेव्हा अल्ताफ राजा यांना मराठीत कव्वाली गाण्याचा प्रस्ताव मांडला. त्यावेळी त्यांनी नकार दिला होता. कारण मराठीत कव्वाली गायन कसे करणार? हा त्यांच्यासमोर यक्ष प्रश्न होता. परंतु याही समस्येवर अल्ताफ शेख यांनी तोडगा सुचवला आणि ते गाण्यास तयार झाले. "हे माझे दूर्वेश बाबा" ह्याच त्या कव्वालीमुळे चित्रपटाने हाई रेंज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, ब्रावो इंटरनॅशनल वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड स्थापित केला; तसेच चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार ही प्राप्त झाला. अनेक राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले.
या चित्रपटाने अवघ्या 21 दिवसांत 115,045,790 एवढा पैसा कमावला. हिंदू मुस्लिम ऐक्यावर आधारित ह्या चित्रपटात सुप्रसिद्ध अभिनेता नागेश भोसले यांची प्रमुख भूमिका होती. अल्ताफ शेख यांच्या लेखणीची जादू भारतातच नव्हे तर विदेशात ही दिसते. 4 बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड नंतर आता 5 बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड त्यांच्या नावे झालाय. याबद्दल सिने सृष्टीतील तारे व राजकीय नेत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. येत्या काळात त्यांचे बेतूका, लोरी हे हिंदीत, धारावी कट्टा हा बहुभाषिक चित्रपट तर "कर्मयोगी आबासाहेब "हा चरित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे.
अल्ताफ दादासाहेब शेख यांची लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाल्याबद्दल "त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या जात आहेत.