माळशिरस तालुका प्रतिनिधी जयराम घाडगे
वेळापूर पोलीस यांच्या वतीने सोलापूर पोलीस अधीक्षक शिरीष देशपांडे ,अपर पोलीस अधीक्षक ,उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली वेळापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बागाव यांच्या नेतृत्वाखाली चोरून अवैध दारू विक्री केली जात असलेल्या दारूवाड्यावर धडक कारवाई करून दारू अड्डे नष्ट करण्यात आले आहेत.
सदर व्यक्तीवर केसेस केलेले आहेत. ५४ हजार ७९५ रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे. तसेच ९३ प्रमाणे प्रतिबंधात्मक ही कारवाई केलेली आहे.
वेळापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गावांमधून जे कोणी चोरून लपून-छपून अवैध दारू, हातभट्टी विक्री करत असतील त्यांच्यावर कारवाई करण्याच्या कामे स्वतंत्र पथक तयार करण्यात आलेले असून त्याद्वारे या लोकांवर कारवाई केली जाt आहे . त्याचबरोबर वेळापूर पोलीस स्टेशन ने आतापर्यंत अवैध दारू धंद्यावर कारवाई करण्या कामी ७९ जणावर केसेस करण्यात आलेल्या आहेत. तसेच जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई करुन १४ केसेस करण्यात आल्या.यावेळी १ लाख २६ हजार ७८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
यावेळी निलेश बागाव म्हणाले की, वेळापूर पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या गावांमधील समाजकटक यांच्यावरती येथील पोलिसांचे लक्ष असून कोणी जातीय, धार्मिक जातीयतेड निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल त्याची कसलीही गय केली जाणार नाही. प्रत्येक गावामध्ये हिंदू मुस्लिम बांधव एकमेकांचे सण साजरे करतात, सर्वजण आनंदाने राहतात तो सलोखा कायम राहावा म्हणून वेळापूर पोलीस स्टेशनच्या वतीने प्रतिष्ठित नागरिकांची बैठक, सर्व जाती धर्माच्या लोकांची बैठक, महिला दक्षता कमिटीची बैठक, पोलीस पाटील बैठक, त्याचबरोबर वेळापूर पोलीस स्टेशनची गाव भेट हे नियमित सुरू असून सर्व बाबींवर वेळापूर पोलीस स्टेशन बारकाईने नजर ठेवून आहे असे हि मत तेज न्युजशी बोलताना निलेश बागाव यांनी सांगितले.
यावेळी वेळापूर पोलीस स्टेशनच्या धडाकेबाज कामगिरीमुळे परिसरातील नागरिकांनी वेळापूर पोलीस स्टेशनचे कौतुक करून अभिनंदन केले आहे.