पंढरपुर प्रतिनिधी
वृत्तपत्र विक्रेत्यांनी आपल्या संघटनेची ताकद वाढवण्यासाठी जास्तीत जास्त विक्रेते यांनी संघटनेचे सभासद व्हावे व संघटनेची ताकद वाढवावी भविष्यात आपल्याला आपल्या मागण्या घरात पाडून घेण्यासाठी रस्त्यावर उतरून लढाई द्यावा लागेल याची तयारी सर्वांनी ठेवावी असे प्रतिपादन राज्यस्तरीय वृत्तपत्र विक्रेता पश्चिम महाराष्ट्राच्या पंढरपूर येथील बैठकीत राज्य संघटनेचे सल्लागार शिवकोंडा खोत यांनी केले.
महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे संलग्न असलेल्या सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा मिरज पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची बैठक पंढरपूर येथे संपन्न झाली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिवगोंडा होत होते कोरोना काळात वृत्तपत्र आणि पीडीएफ फाईल युट्युब व्हाट्सअप वर टाकत होते परंतु आता दोन वर्षात परिस्थिती बदलली असून परिस्थिती पूर्व पदावर येत असताना खप वाढीसाठी प्रेस मालक व्यवस्थापन यांनी प्रयत्न करण्याची सोडून विक्रेत्यांच्याच मागे खूप कमी झाला आहे म्हणून त्यालाच दोष देणे चालू केले आहे.
परंतु वृत्तपत्राचा खप कमी होण्यास वृत्तपत्राचे व्यवस्थापन मालक हेच जबाबदार आहेत हे त्यांच्या लक्षात येत नाही केवळ विक्रीत्यांना दोष देऊन चालणार नाही याकरीता बुलढाणा येथे होणाऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनामध्ये पश्चिम महाराष्ट्राच्या विभागीय बैठकीत जे ठराव करण्यात आले त्यामध्ये प्रामुख्याने या फाईल मोबाईल वर पाठवणे बंद करावे अशी एक मुखी मागणी करण्यात येणार आहे या सर्वांनी एकमुखी पाठिंबा दिला आहे या बैठकीत अनेक विषयावर चर्चा होऊन दिनांक 26 व 27 जानेवारी 23 रोजी बुलढाणा येथे होणाऱ्या राज्यस्तरीय वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अधिवेशन आयोजित केले आहे.
या बैठकीत वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळाची स्थापना करणे पीडीएफ फाईल मोबाईल वर पाठवणे बंद करणे शहर व ग्रामीण असा विक्रेत्यामध्ये भेदभाव न करता सरसकट तीस टक्के कमिशन करावे असे ठराव पास करण्यात आले याचबरोबर वृत्तपत्राचा वाचक वाढावा याकरता विक्रेत्यांनीही वाचक चळवळ राबवावी असे ठरले यासही पश्चिम महाराष्ट्रातील आलेल्या विक्रेते एजंट यांचे स्वागत संतोष रणदिवे व विनोद पोतदार यांनी केले.
यावेळी माजी राज्य सदस्य मारुती नवलाई जिल्हाध्यक्ष किरण हनगुडे रवींद्र लाड सोलापूर जिल्हा अध्यक्ष शिवलिंग मेढेगार, सचिन बाबर, उपाध्यक्ष नंदकुमार देशपांडे, शहराध्यक्ष महेश पटवर्धन, गोरख भिलारे, सावंत यांचे सह पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकारी विक्रेते उपस्थित होते.