पुढील महिन्यात छत्रपती संभाजी राजेचां नाशिक दौरा
गावो-गावी उघडणार शाखा
ईगतपुरी तालुका प्रतिनिधि - नवनाथ गायकर
स्वांतत्र्यानंतर तब्बल ७५ वर्ष तमाम मराठी माणसांची, तरुणाचीं छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेत केवळ फसवणुकच झाली आहे. आता खुद्द छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज कोल्हापुरचे छत्रपती संभाजी महाराज भोसले हे मैदानात उतरले असुन छत्रपतीच्यां खर्या वंशजाचे हात बळकट करा, त्यांच्या पाठिशी उभे रहा असे आवाहन छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी केले आहे.
स्वराज्य संघटनेची इगतपुरी तालुक्याची शाखा उद्घाटन संदर्भात आढावा बैठक वैतरणा ठिकाणी नुकतीच संपन्न झाली. यावेळी प्रमुख मार्गदर्शक या नात्याने ते बोलत होते.
स्वराज्य संघटनेचा "गाव तिथे शाखा, घर तिथे स्वराज्याचा मावळा" या अभियानांतर्गत छत्रपती संभाजी महाराज यांचा पुढील दौरा हा इगतपुरी तालुक्यात असून या तालुक्यातील सर्व गावांचे शाखेचे नियोजन कसे असावे यासाठी आज इगतपुरी तालुक्यातील स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन त्या संदर्भात उपस्थित सर्व नियोजन करण्यात आले आहे.
छत्रपती संभाजी महाराज यांचा हा दौरा यशस्वी करण्यासाठी सर्व स्वराज्य संघटनेचे शिलेदार प्रयत्न करणार आहे. यावेळी कोण कोणत्या गावांमध्ये शाखा उद्घाटन करायचे त्या ठिकाणी नियोजन काय असले पाहिजे याची माहिती सविस्तरपणे स्वराज्याचे प्रवक्ते करण गायकर, स्वराज्य निमंत्रक केशव मामा गोसावी,दिपक, ज्ञानेश्वर थोरात, दिनकर दादा कांडेकर ,विष्णुपंत घुगे, डॉ रुपेश नाठे ,रवी धोंगडे ,नारायण बाबा जाधव यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिली.
यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी वरील पदाधिकाऱ्यांना शब्द दिला की इगतपुरी तालुक्यामध्ये होणारा हा शाखा उद्घाटनाचा कार्यक्रम आतापर्यंत झालेल्या सर्व कार्यक्रमांपेक्षा चांगला करण्याच आम्ही प्रयत्न करू स्वराज्य संघटनेचा गाव तिथे प्रचार करून छत्रपती संभाजी महाराजांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही अहोरात्र मेहनत घेऊ .इगतपुरी तालुक्यातील स्थानिक विषय यापुढे स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून सोडवले जातील त्यासाठी वेळप्रसंगी आंदोलन ही मोठ्या प्रमाणात करायची वेळ आली तरी आम्ही सर्वजण करू छत्रपती सारखे स्वच्छ प्रतिमेचे नेतृत्व समाजाला मिळत आहे या महाराष्ट्राला मिळत आहे याच्यापेक्षा दुसरा कोणताही आनंद नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याला सुराज्य करण्यासाठी छत्रपतींना आम्ही सर्वजण साथ देणार असा संकल्प यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी केला.
यावेळी इगतपुरी तालुक्यातील अनेक पदाधिकारी व ड्रॉ महेंद्र शिरसाठ,विजय निवृत्ती खातळे,भगवान राव, दिपक खातळे,रामेश्वर खातळे,धर्मराज खोडके,छायाताई गोसावी,दिपक गायकवाड, सुनिल खातळे,गुलाब वाजे, भाऊसाहेब खकाळे,गोपीचंद खातळे,तानाजी खातळे,काशीनाथ खोडके,किरण खातळे, प्रतिक गोवर्धन, बाळासाहेब शिंदे,लकी गोवर्धन,उमेश खातळे,बस्तीराम खातळे,प्रभाकर ईचम,तुकाराम गायकर,शिवाजी खातळे,दशरथ जमधडे,न्यानेश्वर जमधडे,गणेश नाठे , जिवन नाठे , अजय कश्यप मोठ्या संख्येने उपस्थित होते.